'दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल', अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीनं केली आहे. 'शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल', अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.