मागील काही वर्षात मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि दंगली यांसारख्या अत्यंत गंभीर घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील काही ठळक आकडेवारी जर पाहीलीत तर त्या नुसार 2013 -14 ते 2017- 18 पर्यंतच्या अहवालानुसार, बलात्कार, विनयभंग आणि दंगलींसारख्या गुन्ह्यात अनुक्रमे 83%, 95%, 36% वाढ झाली आहे. तर साल 2015-16 ते 2017-18 या वर्षात लैंगिक गुन्ह्यांपासून बालक संरक्षण अधिनियम (पोस्को) या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 19 % वाढ झाली असे नमूद केले आहे.
सोबतच 2015- 16 मध्ये एकूण 891 पोस्को कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असून, हे प्रमाण 2017-18 याच तक्रारींचे प्रमाण 1062 एवढे नोंदविले असे गंभीर नोंद यामध्ये आहे. पोलिसांसंदर्भात अहवालात सुद्धा गंभीर नोंद केली आहे. यानुसार जुलै 2018 पर्यंत मुंबई पोलीस दलात 22% कर्मचाऱ्यांची कमतरता असून , 32% लोकांना पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही त्यमुळे त्यांनी पोलिसांना आपल्याबद्दल घडलेल्या गुन्ह्याबाबत माहितीच देण्याचे टाळले आहे. लोकांच्या मते 23% , पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे एक वेदनादायक गोष्ट असून, गुन्हा घडताना पाहिलं होते मात्र तरीही पोलिसांना माहिती न देणाऱ्यांची संख्या 25% इतकी आहे. कारण ते पोलिसांच्या जाचास अडकू इच्छित नाही.
2017 पासून 2018 पर्यंतच्या अधिवेशनांमध्ये बलात्कार विषयावर दक्षिण मुंबईच्या आमदारांनी केवळ 5, ईशान्य मुंबईच्या आमदारांनी 2, तर उत्तर मुंबईच्या आमदारांनी 2 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे हा अहवाल फार महत्वाचा ठरत असून यामुळे मुंबई किती असुरक्षित असून लोकांचा पोलिसांवर विश्वास नाही हे उघड होतें आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि सरकारला याबद्दल कठोर भूमिका घेवून लोकांना विश्वास वाटेल असे काम करणे आता गरजेचे आहे, कारण पूर्ण देशातून मुंबई येथे करोडो लोग रोज येत असतात त्यामुळे सुरक्षा ठेवणे आता गरजेचे झाले आहे,