महिलेला सहकाऱ्याकडून मारहाण, चालत्या गाडीतून फेकण्याचा केला प्रयत्न

शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:09 IST)
पुण्यातील मगरपट्टा सिटीत एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला तिच्या सहकाऱ्याने मारहाण करुन चालत्या गाडीतून फेकण्याचा प्रयत्न केला आहे. झुबेर पटेल(२५) असे सहकाऱ्याचे नाव असून या दोघांचेही पूर्वी प्रेमसंबंध होते. शुक्रवारी पहाटे 4.30च्या सुमारास नाईट शिफ्ट संपवून घरी जात होते. गाडीतून दोघं एकत्र जात असताना त्यांच्यामध्ये काही कारणातून वाद झाला.  वाद विकोपाला गेला की झुबेरने तिला गाडीतच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेला गाडीत बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिला चालत्या गाडीत फेकण्याचाही प्रयत्न झुबेरने केला. त्याचवेळी चालकाला हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि त्यानं वेळीच गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यासंपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने झुबेर पटेल विरोधात खडकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी झुबेरला अटक केली.

वेबदुनिया वर वाचा