यामध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरुन मृत वृद्ध आणि एक तरुण दोघांमध्ये बाचाबाची झाली होती . तर या मधील वृद्ध काशीनाथ यामजले यांनी घरापुढे फटाके फोडू नको असं सांगितल्याने चिडलेल्या राहुल जमादार या 20 वर्षीय तरुणाने त्यांना जबर मारहाण केली. या घटनेत काशीनाथ यामजले जखमी झाले आणि यांचा मृत्यू झाला. यानंतर सोलापूर बझार पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.