महाराष्ट्रातील कोरोनामुक्त गाव स्पर्धा,50 लाखाचं प्रथम बक्षीस देण्यात येईल -हसन मुश्रीफ

बुधवार, 2 जून 2021 (18:28 IST)
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोनामुक्त गाव,तालुका,जिल्हा,आणि अवघे महाराष्ट्र व्हावे या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे ही घोषणा ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.या साठी चांगल्या कामगिरी करणाऱ्या पहिल्या ग्राम पंचायत ला 50 लाख रुपये,दुसऱ्याला 25 लाख रुपये,आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या ग्राम पंचायत ला 15 लाख रुपये बक्षिसे देण्यात येतील.6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कोरोना मुक्त गावाचे गौरव करण्यात आले होते.त्या उपक्रमाला अधिक चालना मिळावी आणि जास्तीत जास्त गाव ,तालुके,जिल्हे कोरोनामुक्त व्हावे या अनुषंगाने या स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष -2515 व 3054 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या 3 ग्राम पंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व15 लाख रुपये इतक्या निधीची विकास कामे मंजुर करण्यात येणार.

या स्पर्धेचे गुणांकन सहभागी गावाचे विविध 22 निकषांवर करण्यात येण्याचे असून या संदर्भात शासन सविस्तर निर्णय आज जारी  करण्याचे सांगण्यात आले.
या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त करावे आणि बक्षीस जिंकावे असे आवाहन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती