यावर्षी जानेवारी महिन्यात स्नेहाच्या मैत्रिणीला रस्त्यात कुत्र्याचे पिल्लू सापडले. ती स्नेहाच्या घरी घेऊन आली. आपण त्या कुत्र्याच्या पिल्लाचे ‘कुकी’ असे नामकरण केले व त्याची देखभाल करत होतो असे स्नेहाने सांगितले. सहा सप्टेंबरला सकाळी ५.३०च्या सुमारास स्नेहाला तिच्या आईने अश्विनीने उठवले व कुकी सोसायटी बाहेर गेल्याचे सांगितले. स्नेहा लगेच झोपेतून उठली व तिने कुकीचा शोध सुरु केला. स्नेहाने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तिची आईच सकाळी सव्वाचारच्या सुमारास कुकीला इमारतीबाहेर नेत असल्याचे दिसले. स्नेहाने जेव्हा याबद्दल आपल्या आईला विचारले तेव्हा कुकीला मी बाहेर घेऊन गेले पण तो कुठे गेला हे माहित नाही असे उत्तर दिले. स्नेहाने आता आपल्याच आईविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.