राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होत असून ते गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि शेतकरी आत्महत्या आणि राज्यातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी अधिवेशनापूर्वीच कर्जमाफीपोटी सुमारे 19 हजार कोटी रुपये बँकांकडे पाठविले आहेत.
राज्यात विरोधक सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करत आहेत. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या तिजोरीवरील डल्लामारचे पुरावे सभागृहासमोर सादर करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विरोधकांनी काढलेली यात्रा ही हल्लाबोल नव्हे, तर डल्लामार यात्रा होती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.