पालक मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या अदिति तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे तर गिरीश महाजन यांना नशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. या वर शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी अदिति तटकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले नाराज आहेत. गोगावले हे रायगड जिल्ह्यातील आहेत. रायगडचे पालकमंत्री होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते.
तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते दादा भूसे यांनी देखील गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री जाहीर केल्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे हेही आपल्या गृहजिल्ह्य़ाचे पालकमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले. याचा राग दादा भुसे यांनाही होता.
राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने होणा-या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोस येथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले.