लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात.मुलं रडल्यावर त्यांना शांत करण्यासाठी आपण चॉकलेट खायला देतो. पण चवीत गोड असणारी चॉकलेट एखाद्याचा जीव घेऊ शकते हे अशक्य आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे 9 महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचे चॉकलेट अडकल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीत गुहागर येथे साखरी आगर गावात तेरेकर कुटुंबातील ही दुर्देवी घटना आहे.रिहांश तेरेकर असे या मयत बाळाचे नाव आहे. पालकांनी 9 महिन्याच्या बाळाला जेलीचे चॉकलेट खायला दिले असता जेलीचे चॉकलेट त्याच्या घशात अडकले आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.त्याला तातडीने रुग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी त्याला घोणसरे रेफर केले. घोणसरे येथील रुग्णालयात नेत असताना चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.