दरम्यान, यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्सप्रेस या बिघाडामुळे खोळंबल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.