शिवसृष्टीतील सरकारवाडय़ात उभ्या केलेल्या ऐतिहासिक थिम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन ही शिवसृष्टी आता नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी या शिवसृष्टीला आज भेट दिली. यावेळी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, अरविंदराव खळदकर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. गोव्यात सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार करून छत्रपतींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे भाग्य गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो, अशा भावना डॉ सावंत यांनी यावेळी व्यक्त केल्या.