माविआ सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि 40 आमदारांसह गुवाहाटी जाऊन बसले. माविआ सरकार कोसळली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. राज्यात आपली सत्ता स्थापित झाल्यावर गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनास 40 आमदारांसह येणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. आता देवी कामाख्याच्या दर्शनास मुख्यमंत्री 40 आमदारांसह येत्या 21 नोव्हेंबर रोजी जाण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या साठी पूर्व तयारी सुरु झाली असून सर्व 40 आमदारांना या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 40 आमदारांसह मुख्यमंत्री गुवाहाटीच्या एकदिवसीय दौरा करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती .आता त्यांच्या दौऱ्याची तारीख ठरली असून ते 21 नोव्हेंबर रोजी 40 आमदारांना घेऊन जाणार आहे. दरम्यान ते गुवाहाटीच्या मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलीस कामिश्रांची भेट घेणार. तसेच त्या काळात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने त्यांची मदत केली त्यांना भेटणार.अशी माहीती सूत्रांकडून मिळाली आहे.