चंद्रकांत पाटील म्हणाले संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांनी जल्लोष केला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेना खासदार संजय राऊत (Chandrakant Patil attack on Sanjay Raut) यांच्यावर तुफान हल्ला चढवला. “संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली. पाठीत खंजीर खुपसला ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभत नाही. त्यांनी  आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असं हल्लाबोल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil attack on Sanjay Raut) यांनी केला.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, “24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं. शिवसेनेने युतीने युती तोडली. पर्याय खुले ठेवले. महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेचा सर्व खेळ पाहिला. निकालानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करतील असं वाटत होतं. मात्र, त्यांचं प्रेम वाढतच गेलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, सावकरांचा विषय सोडला, शिवाजी महाराज यांनाही सोडलं”
 
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता तरी बोलणं बंद कर ना बाबा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
 
आम्ही प्रत्येकवेळी मातोश्रीवर गेलो, पण त्यांना वेळ मिळाला नाही. ते सिल्वर ओकवर गेले. ते तरी ठिक, पण ते बाळासाहेब थोरात यांना भेटायला हॉटेलमध्ये गेले. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आम्ही त्यांना सांगणारे कोण, आम्ही त्यांना सुचना करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
संजय राऊत काय म्हणाले?
अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते. ते लक्षात येत होतं, शरद पवार यांच्याही लक्षात आलं. त्यानंतर ते बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. ते वकिलाकडे बसल्याचं सांगण्यात आलं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते ते आज सकाळी कळालं. यामागे शरद पवार यांचा हात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पवारांच्या मागे उभा राहिला. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यावेळी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्याचवेळी आम्हाला संशय आला होता, असं संजय राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती