Photo- Socal Media विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने ते नाराज आहेत. विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड निवडून आले. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. आता नाराज असलेले चंद्रकांत हंडोरे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्यानंतर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत हंडोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.