राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काल पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसाच्या पाण्यानं नवीमुंबईत झडी लावली आहे. हवामान खात्यानं मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल पासून मुबंईत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांची हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे. येत्या चार ते पाच दिवसात हवामान खात्यानं मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. नवी मुंबई परिसरात देखील दोन दिवसानंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या भागात वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कोकणात देखील पावसाचा जोर वाढला असून रत्नागिरी, चिपळूण रस्त्यात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नदीचं स्वरूप आलं आहे.