राज्यात पावसाची शक्यता

बुधवार, 18 मार्च 2020 (11:54 IST)
देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्यातच काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  आहे. 17 ते 22 मार्चदरमन औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खानदेशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.दुसरीकडे, मध्य प्रदेशात भोपाळ, बैतूल, होशंगाबाद आणि देवास यासारख काही प्रमुख ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो. 
 
हाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण कोरोना व्हायरससाठी पोषक असल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे काल तापानात 6 अंशांर्पंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती