सप्तशृंग गडावर ४ एप्रिलला फडकणार चैत्रोत्सवाचा ध्वज

गुरूवार, 16 मार्च 2023 (08:20 IST)
अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी गडावर यंदाचा चैत्रोत्सव ३० मार्च ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत साजरा होणार असून, मंगळवारी दि. ४ एप्रिल रोजी श्री भगवतीच्या कीर्तीध्वजाचे विधिवत पूजन होऊन मानकरी गवळी परिवारातील प्रतिनिधी श्री भगवतीच्या पर्वत शिखरावर रात्री ध्वजारोहण करणार आहेत.
 
चैत्रोत्सव दिमाखात साजरा होण्यासाठी प्रशासकीय नियोजनाची बैठक तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१५) झाली. यावेळी श्री सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान नियोजित असून, यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय स्तरावर विविध शासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली.
 
बैठकीस विश्वस्त ॲड. ललित निकम, कळवणचे पोलिस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. दीपाली गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक असिफ शेख, राज्य उत्पादन शुल्कचे मुख्य निरीक्षक ए. बी. सोनार, अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी गो. वि. कासार, राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक अ. भ. सिप्पा, आगार व्यवस्थापक हेमंत पगार, सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. जी. गायधनी, श्रीमती ए. एस. पवार, महावितरणचे अधिकारी पी. एस. उगलमुगले, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, सप्तशृंग गडाचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, रोप वे अभियंता समाधान खैरनार आदी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती