गुढीपाडव्यानिमित्त यंदा पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढू नयेत, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक जमा न होता सामाजिक अंतर व मास्क, सॅनिटायजरचा वापर करुन घरगुती गुढी उभारुन साधेपणाने सण साजरा करावा अशी सूचना केली आहे.