लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणत आहे. जात, धर्म, राजकारणापलीकडे याकडे पाहायला हवं. भारताच्या लोकसंख्येची स्थिती विस्फोटक अशी आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा शुद्ध हेतू काय? शिक्षण,आरोग्य याबाबत व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपुरे पडले.आता करून भागले आणि लोकसंख्या नियंत्रणाला लागले असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे म्हणून हिंदूंनी कुटुंबनियोजन करू नये, चार-पाच मुलांना जन्म द्यावा असा महान विचार मांडणारे हिंदुत्ववादीच आता लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणत आहेत.अन्न-वस्त्र-निवारा यासारख्या मूलभूत गरजा नागरिकांना पुरवण्यात सरकार कमी पडलं.लोकसंख्येची काळजी घेतली असती तर याच लोकसंख्येने देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं असतं.