Beed News : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून शांत झालेला नाही तर आता आणखी एका हत्येची बातमी समोर येत आहे. गुरुवारी रात्री बीडमध्ये जमावाने तीन जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला आणि तिसरा गंभीर जखमी झाला. ही घटना अंभोरा पोलिस स्टेशनचा परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील हातोलन गावातील रहिवासी अजय विलास भोसले, भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघेही वहिरा गावात आले होते. तसेच स्थानिक गावातील आणि बाहेरील काही लोक तिथे जमले होते. संध्याकाळी त्यांच्यात चर्चा सुरू होती जी रात्री उशिरापर्यंत वादात रूपांतरित झाली. रात्रीच्या वेळी हा वाद इतका वाढला की त्याने हल्ल्याचे रूप धारण केले आणि जमावाने लाकडी दांडक्या आणि धारदार शस्त्रांनी तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात अजय आणि भरत भोसले हे दोघे भाऊ जागीच मृत्युमुखी पडले, तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाले.सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण, वादामुळे या हल्ल्यात दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिस तपासादरम्यान सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.