मुंबईतील आरबीआय कार्यालयला बॉम्बने उडवण्याची धमकी

बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:02 IST)
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयाला ई-मेलद्वारे धमकीचा मॅसेज आला आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. तसेच आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसी बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली. या धमकीनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या ईमेल आयडीवर मंगळवारी सकाळी खिलाफत इंडिया नावाच्या ईमेलवरुन धमकी देण्यात आली आहे. दुपारी दिड वाजता मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील, अशी धमकी देण्यात आली होती.
 
काही मागण्या देखील या ईमेलमधून करण्यात आल्या होत्या. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे नाव घेऊन मोठा घोटाळा देशात होत आहे. त्यामुळे या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्या, अशी मागणी देखील ईमेलमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अधीकृत ईमेलवर आयडीवर ही धमकी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता 11 ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.

Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती