भाजपला योग्यवेळी उत्तर दिलं जाईल : अनिल परब

शुक्रवार, 18 जून 2021 (16:24 IST)
शिवसेना भवनावर भाजपने मोर्चा काढल्यानंतर  जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही भाजपला उत्तर देऊ, असा इशारा भाजपला दिला आहे. 
 
अनिल परब पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला. त्याचं उत्तर भाजपला योग्यवेळी उत्तर दिलं जाईल, असं परब म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावर देखील भाष्य केलं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी सांगितलं. \
 
पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल परब दिली. महामेट्रो आणि MSRDC यांचा जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट होता. त्याला लागूनच ST ची जागा आहे. लोकांच्या सोयीसाठी एकत्रच सुविधा देण्याचा विचार आहे. अद्यावत मेट्रो, रेल्वे आणि एस टी जवळ जवळ असेल. वेगवेगळा भुयारी रस्ता त्यासाठी करतोय, एकाच ठिकाणी सुविधा देण्याचा विचार आहे. जुलै २२ पर्यंत सगळं काम पूर्ण होईल, असं ्निल परब यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती