भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित

बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (16:20 IST)
भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत.एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा कधी सुरू करायची, याचा निर्णय होणार आहे.राणे यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली.त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी महाड न्यायालयाने त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर रात्री उशिरा जामीन मंजूर केला. 
 
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठी घडामोड घडली.रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक केली.केंद्रीय मंत्र्याला प्रथम श्रेणी दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले.पोलिसांनी न्यायालयात राणे यांच्या 7 दिवसांच्या रिमांडची मागणी केली पण न्यायालयाने केंद्रीय मंत्र्याला जामीन मंजूर केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती