भाजप नेते गिरीश बापट यांची नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (23:04 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून राणेंना पाठिंबा देण्यात आला आहे मात्र त्यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलं नाही. आता गिरीश बापट यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.
 
बापट यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळली पाहिजे. सामान्य जनतेला अशी वक्तव्ये आवडत नाहीत. यामुळे जे सामान्य जनतेला आवडते. तेच चांगले असून आपल्याला ते करायला हवं. यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा जनतेत जाऊन जनतेची कामं आपण करु. मुख्यमंत्री असो किंवा नारायण राणे यांनी आपापली मत मांडायला आमची हरकत नाही. परंतु अनेक गोष्टी या अडचणीच्या आहेत त्यांचे रुपांतर नको त्या गोष्टीत होते यामुळे आपण सगळ्यांनी ते टाळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती