माजीमंत्री विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील या ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य निवडीची परंपरा होती. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत झाली होती. विखे विरोधकांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून विखे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत ते लीलया पेलले आहे. विरोधातील पॅनलच्या उमेदवारांवर विश्वास दर्शविला आहे. १७ पैकी १३ जागावर विजय मिळवून देत ग्रामस्थांनी सत्तांतर घडवून आणले. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत एकहाती आपल्या हाती राखणाऱ्या माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.