पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धम्मिका निरोशन आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्ति ने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये धम्मिका निरोशन यांचा मृत्यू झाला आहे. अजून पोलीस आरोपीला पकडू शकली नाही आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे. व आरोपीचा शोध घेत आहे. व तपास करीत आहे की, धम्मिका निरोशन यांची हत्या का करण्यात आली आहे.
धम्मिका निरोशन डाव्या हाताचे चांगले बॉलर होते. जरी त्यांना कधी श्रीलंकाच्या सीनियर क्रिकेट टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण धम्मिका निरोशन ने फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये12 मॅच खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी 19 विकेट चटकावले होते. याशिवाय त्यांनी लिस्ट ए मध्ये 8 मॅच खेळले होते, या आठ मॅच मध्ये त्यांच्या नावावर 5 विकेटची नोंद आहे.