भीमा कोरेगाव - लोकसभेत सरकारला कॉंग्रेसने घेरले

भीमा-कोरेगाव घटनेचे बिघडलेली स्थितीवर आता  संसदेतही पडसाद  उमटले आहेत. या मध्ये लोकसभेत विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली असून सरकारला जोरदार घेरले आहे. त्यामुळे भाजपा सरकार अडचणीत आले आहे. 
 
कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे  म्हणतात की   ज्या-ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे त्या ठिकाणी  तिथे मागासवर्गीय लोकांवर  अत्याचार होतो आहे आणि आता ते समोर दिसते आहे. खरगे पुढे म्हणाले की समाजात दुही माजवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे लोक असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा यामागे हात आहे त्यामुळे सर्वत्र अशांतता आहे. पंतप्रधानांनी याप्रश्नी संसदेत बोलावे ते या विषयावर गप्प राहू शकत नाहीत, पंतप्रधान असे काही घडले की ते  ‘मौनीबाबा’ असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.  सोबत या भीमा-कोरेगाव घटनेचे  पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. यामध्ये लोकसभेत काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे . 
 
भीमा कोरेगाव प्रकरणाची संपूर्ण चौकशी  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींची नेमणूक करण्याची मागणी खरगे यांनी केली आहे. मात्र यावर लोकसभेत जोरदार आरोप प्रतिआरोप झाले आणि  खरगे यांच्या वक्तव्यावर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आक्षेप घेतला आहे.  यामध्ये अनंतकुमार यांनी  काँग्रेस आग विझविण्याऐवजी आग भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.  लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले आहे. महाजन यामध्ये म्हणाल्या की  याप्रश्नी राजकारण करण्यापेक्षा चर्चा व्हावी असे सांगत त्यांनी खरगे यांना संसदेत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला मागसवर्गीय समाजाचे  भलेही नकोय आणि चर्चाही नकोय का ?असा सवाल महाजन यांनी केला आणि सांगितले की  या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची त्यांनी विनंतीही केली आहे. एकूणच  भाजपला भीमा कोरेगाव हे प्रकरण चांगलेच भोवणार असे दिसते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती