रेस अराउंड ऑस्ट्रिया पूर्ण करणाऱ्या भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांचे जंगी स्वागत

शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (13:14 IST)

रेस पूर्ण करणारे पहिलेच भारतीय बनण्याचा मिळवलाय मान

नाशिकचे सायकलीस्ट लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांचे नाशिक सायकलीस्ट शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला आहे.

पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत त्यांचे आशीर्वाद पन्नू आणि दुबे यांनी स्वागतचा स्वीकार केला. यावेळी नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस, नाना फड, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ आणि पन्नू आणि दुबे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्याना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.


लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टीलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटीकल इंजिनिअर असून ब्रेवेट उपक्रमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलीस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलीस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरी निमित्ताने ते बंगळूरू येथे असतात.

'टीम इंस्पायर इंडिया'चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किमीची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना 'टीम इंस्पायर इंडिया'ने केवळ १०० तासात स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्याच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.

वेबदुनिया वर वाचा