बीडच्या जिल्हा पोलिस दलातील एका २७ वर्षीय महिलेच्या शरिरात बदल जाणवत असल्याने तिने चक्क पुरुष होण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. हा विषय अधीक्षकांच्या अधिकारात नसल्यामुळे त्यांनी सदरील महिला कॉन्स्टेबलचा अर्ज पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. पोलिस सेवेत कायम राहण्यासाठी हा अर्ज त्या महिलने केला आहे.
दरम्यान, एक महिन्यापूर्वी सदरील महिला कॉन्स्टेबलने पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे पुरुष होण्यासाठीची परवानी मागितली. अधीक्षकांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊन सदरील अर्ज पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे. यापूर्वी असे प्रकरण कधीही समोर आले नाही. एखादी महिला पोलिस कर्मचारी शस्त्रक्रिया करुन पुरुष झाली तर त्याला सेवेत घ्यावे की नाही याबाब काही शासन निर्णय आहे का याची चाचपणी सध्या सुरु आहे.