बीड पुन्हा हादरलं,सौंदाणा गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू

रविवार, 12 जानेवारी 2025 (13:53 IST)
महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर आता पुन्हा एका सरपंचाचा मृत्यु झाला आहे. परळी तालुक्यातील सौंदाणा गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला.राख वाहून नेणाऱ्या टिप्परने परळी तालुक्यात मोटारसायकलस्वाराला चिरडले.या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला.

बीडमधील परळी तालुक्यातील निरवट जंक्शन येथे हा अपघात झाला. अभिमन्यू हे क्षीरसागर सौंदाना गावचे सरपंच होते.

अभिमन्यु  हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील निरवट  जंक्शनकड़े दुचाकीने जात असताना राख वाहून नेणाऱ्या एका टिप्परने जोरदार धड़क दिली. धड़क एवढी जोरदार होती की अभिमन्यु हे जागीच ठार झाले. 
अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेने बीड जिल्ह्यात राख वाहतुकीच्या चर्चेला उधाण आले आहे. 
ALSO READ: नागपुरातील मेयो रुग्णालयासाठी निधीची कमतरता भासणार नाही, देवेंद्र फडणवीस
अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून हा अपघात होता की सुनियोजित कट होता, अशी शंका आता उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.
 
या घटनेने बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राख वाहतुकीबाबत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती