आनंदाची बातमी या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू

गुरूवार, 11 जुलै 2019 (16:16 IST)
मराठा समाजाला दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. मराठा समाजातील वैद्यकीयशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी दिली आहे. या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशां मध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने पूर्णतः फेटाळली, या आगोदर जरी प्रवेश प्रक्रिया आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे. या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये तर २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण द्यावे तर राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली, एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया १ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झाली. त्यानंतर, राज्य सरकारने एसईबीसी कायदा मंजूर केला. एमबीबीएसच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले, परंतु मार्च महिन्यात राज्य सरकारने एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून त्यामुळे आता मराठा मार्चचे मोठे यश म्हणावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती