अनिल देशमुख यांच्या शिक्षणसंस्थांवर EDचा छापा

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (17:20 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेद्वारे सं‍चालित एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीने छापा मारला. नागपूर तालुक्यातील माऊरझरी येथील NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर शुक्रवारी दुपारी ईडीने धाड टाकली. तब्बल तीन तास छापेमारी चालली.
 
देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापार्‍याने डोनेशन म्हणून या संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्याचा तपास करण्यासाठी ईडीने छापा मारला. ईडीसोबत सीआरपीएफचे पथक देखील होते.
 
साई‍ शिक्षण संस्थेचे कॉलेज येथे काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या संस्थेचे संचालक अनिल देशमुख हे आहेत. कुटुंबीयातील इतर सदस्य समितीची भाग आहेत. 
 
ईडीने यापूर्वी देशमुख यांच्या मुंबई, नागपूर, काटोल येथल्या निवासस्थळी आणि संस्थांवर छापे टाकले होते. त्यावेळी काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे लक्षात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती