पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minster Narendra Modi) यांचा निषेध करण्यासाठी राज्यभरात काँग्रेस निदर्शनं करणार आहे. त्याआधी अनिल बोंडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलंय. याबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीनं नाना पटोलेंच्या मोदींविरोधात नियोजित निषेध आंदोलनाबाबत बोलताना अनिल बोंडे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानं आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याआधी बुधवारी संध्याकाळी डॉ. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात अनिल बोडें यांनी म्हटलंय की, आज नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी म्हटलं की काँग्रेसचं काळं कुत्र जरी भाजप कार्यालयावर आलं, तर झोडून काढू! एका व्यक्तीसोबत फोनवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे आता नवा वाद झेडला जाण्याची शक्यता आहे.
आज नाना पटोले यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार…भाजपने माफी मागावी म्हणून! खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही, मुख्यमंत्री आले नाही, नाना पटोले फिरकले नाही.