एका आमदाराने अधिकाऱ्यावर चिखलफेक केली होती,ती त्यांना चालते का ?

मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (16:36 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पलटवार केला आहे. विकासकामांत अडथळा या मुद्द्यावरून गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र गडकरी यांच्याच पक्षाच्या सिंधुदुर्गातील एका आमदाराने अधिकाऱ्यावर चिखलफेक केली होती.ती त्यांना चालते का असा सवाल,नितेश राणे यांचे नाव न घेता भास्कर जाधव यांनी केला. 
 
शिवसेनेच्या दहशतीमुळे महामार्गांची कामं बंद आहेत. वाशिम जिल्ह्यात लोकप्रतिनिधींचे कामात अडथळे आणत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात, पुलगाव -सिंदखेडराजा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरु आहे. वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणच काम पूर्णत्वास गेले आहे.रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराकडून काम सुरु आहे. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून यंत्रसामुग्रीची जाळपोळ केल्याने कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत. त्यामुळे ते काम पुन्हा बंद आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
 
दरम्यान, आम्ही शेतकरी हितासाठी भांडलो, रस्त्याच्या कामात आडकाठी आणण्यासाठी नव्हे, अशा शब्दांत वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तर महामार्गाच्या कामात शिवसेनेने कुठेही अडथळा निर्माण केला नाही. गडकरी यांना पत्र लिहून तसे कळवणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री, राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती