छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य अश्वारूढ पुतळा तयार करण्याचं काम पुण्यात सुरु होत. 25 फूट उंच आणि 8 टन वजनी असलेल्या हा पुतळा तयार झाल्यावर शुक्रवारी हा पुतळा पुण्यातून एका मोठ्या ट्रेलर मध्ये औरंगाबाद कडे निघाला. अखेर आज पहाटे हा पुतळा औरंगाबाद मधील क्रांती चौकात बसविण्यात आला. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी होऊ नये या साठी उड्डाणपूल बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात विराजमान झाला .