मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढलं होते. दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!”