Akkalkoat : नदीच्या पाण्यातून नेले पार्थिव

मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (17:02 IST)
सध्या राज्यात पावसाचं सत्र सुरु आहे.राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीला पूर आला आहे. राज्यात अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील हरणा नदी दुथडी वाहत असून त्याला पूर आला आहे. नदीच्या पळी कडे जाण्यासाठी पितापुरच्या नागरिकांना रिकाम्या बॅरलचा आधार घेत नदी ओलांडावी लागत आहे. इथल्या ग्रामस्थांनानी नदीवर पूल बांधण्याचे प्रशासनाला अनेकदा मागणी केली असून देखील आजतायागत हरणानदीवर पूल बांधले गेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात इथल्या नागरिकांना नदीपलीकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत असते लोकांना आपला जीव धोक्यात टाकून रिकाम्या बॅरलच्या आधारे छोटी नाव तयार करून नदी ओलांडावी लागत आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकसंख्या दोन हजारच्या जवळ आहे. इथे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेताला अंत्यसंस्कारासाठी नदीच्या पलीकडे असलेल्या कब्रिस्तानात घेऊन जावे लागते .
 

अक्कलकोट तालुक्यात मुस्लिम समाजाचे कब्रिस्तान नदीच्या पलीकडे असल्यामुळे अनेक वर्षांपासून मुस्लिम समुदायाचे लोक नदीमधून जीवघेणं प्रवास करतात आणि आपल्या नातलगाचं अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून प्रेत नेतात . अशी एक मनाला हादरवून टाकणारी घटना आज घडली आहे. इथे आज नूर सायब अली भांडारी(45) यांचे आज निधन झाले. यांचे पार्थिव रिकाम्या बॅरल वरून ग्रामस्थांनानी कब्रस्तान नदीच्या पलीकडे असल्यामुळे आणि नदीवर कोणतेही पूल नसल्यामुळे नदीतून वाहतूक करत नेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनाला सुन्न करण्याऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती