"पण आता कसं गाडीसमोर कॅमेरा लावला जातो, मग कुणीतरी गाडीतून उतरतं, मग दर्शन घेताना व्हीडिओ केला जातो. आता काहींना शो करायची सवय आहे. जसा राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तसा काहींना शो करायची सवय आहे. आता जनतेनेच पहावं काय चाललंय
तसंच यावेळी ते दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी सुद्धा बोलले. यंदा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा दसरा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण, जनता कुणाच्या पाठिशी हे दसरा मेळाव्यानंतर कळेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
ते म्हणाले, "जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतर कळेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे. या शिवाजी पार्कवरच शेवटी त्यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात चालेल. आज ज्यांच्या हातात पॉवर आहे ते त्यांना हवं तसं करतात. पण सामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल."