अहमदनगरच्या खरे कर्जुले गावात पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या शस्त्रसाठ्यात 25 किलो दारुगोळा, 25 पिस्तूल राउंड आणि 12 बॉम्ब सापडले आहे. पोलिसांना शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून हा शस्त्रसाठा जप्त केला. गावातील एका घरात बॉम्ब आणि शस्त्रांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घरात छापा टाकून त्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव दिनकर शेळके आहे.पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे.
अहमदनगर हे भारतीय लष्कराचे के. रेंज. हे रणगाड्यांचे प्रशिक्षण केंद्र असून या ठिकाणी बॉम्ब स्फोट करण्याचे प्रशिक्षण जवानांना दिले जाते. अनेकदा बॉम्बस्फोट होत नाही आणि न फुटलेले बॉम्ब जवान गोळा करतात .पण काही वेळा हे बॉम्ब सापडत नाही आणि जंगल क्षेत्रात फेकल्याने जवान घ्यायला जात नाही . तिथे गावातील लोक बॉम्ब गोळा करून त्याला फोडून भंगारात विकतात.