२ उद्योजकांनी १२ कर्मचार्यांना चक्क गाड्या भेट दिल्या
अहमदनगरमधील दोन उद्योजकांनी आपल्या 12 कर्मचार्यांना गुढीपाडव्यानिमित्त चक्क गाड्या भेट दिल्या. झेन इलेक्ट्रिक कंपनीचे संचालक मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी कर्मचाऱ्यांना गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत.
ही भेट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक आणि श्रद्धापूर्वक केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी दिली. झेन’ च्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली.