महाराष्ट्र सरकारने सोमवारी 'अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ' या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी150 कोटी रुपयांचा निधी जारी केला, ज्यामुळे आतापर्यंत या प्रकल्पासाठी वाटप केलेली एकूण रक्कम 2,091कोटी रुपये झाली आहे. "17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्ती दिनापूर्वी हे एक विशेष पाऊल आहे," असे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण खर्च 4,085कोटी रुपये आहे आणि या रकमेपैकी 50 टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा17 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून त्यामुळे लाखो रहिवाशांची प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे.
हा रेल्वे मार्ग 261 किमी लांबीचा असून, त्याची अंदाजे किंमत 4,805 कोटी रुपये आहे आणि यामध्ये राज्याचा वाटा 2,402 कोटी रुपये आहे. राज्य सरकारचा वाटा म्हणून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेल्वेला 150 कोटी रुपये दिले जातील. बीडचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पवार यांनी विमानतळ, रस्ते आणि रेल्वे विकासासह पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य दिल्याचे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पवार म्हणाले, "अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ मार्ग शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांचे जीवन बदलून टाकेल. यामुळे गुंतवणूक वाढेल, रोजगार निर्माण होतील आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.