खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात! निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना

गुरूवार, 13 जुलै 2023 (07:47 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता आणखी एका आमदाराची ताकद मिळाली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.  आमदार काळे गेल्या आठवड्यात विदेशात दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणत्या गटाला असणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत २६ हून अधिक आमदारांनी हजेरी लावली होती. यामुळे पवार यांना जास्त पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, तर शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीतही वीसहून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला होता.  
 
खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात!
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असे सांगितले जात होते. मात्र, खातेवाटपावरून एकमत होत नसल्याने हा तिढा सुटताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटासह मित्र पक्षांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही खात्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसत आहे. आता खातेवाटपाचा वाद केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या कोर्टात गेल्याचे सांगितले जात आहे. यासाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती