राज्यात अपघात कमी झाले, मात्र संख्या वाढली

सोमवार, 5 मार्च 2018 (10:35 IST)

गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील नऊ शहर- जिल्ह्य़ांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे. त्यात विदर्भातील ४ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात पुण्यात वाढले आहेत. परिवहन खात्याकडे सादर झालेल्या एका अहवालानुसार वर्ष २०१७ मध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण १०.०३ टक्क्यांनी कमी झाले आहे, परंतु शहरातील सर्व जिल्हे व शहरांची स्थिती बघता नऊ शहर-जिल्ह्य़ांत अपघात वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

वर्ष २०१३ आणि २०१४ मध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण ०.४२ टक्क्यांनी कमी झाले होते, परंतु २०१५ मध्ये त्यात ३.५३ टक्के वाढ झाली. २०१६ मध्ये प्रथमच राज्यात ३७.५५ टक्यांनी अपघात कमी झाले. २०१७ मध्ये राज्यात १०.३ टक्क्यांनी अपघात कमी झाले असले तरी राज्यातील नऊ शहर- जिल्ह्य़ांमध्ये अपघाताची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे. अपघात वाढलेल्या शहर- जिल्ह्य़ांमध्ये पुणे (ग्रामीण) ४.९२ टक्के, औरंगाबाद (ग्रामीण) १३.०८ टक्के, जालना ५.८८ टक्के, बीड- ११.४० टक्के, अकोला- १.२८ टक्के, भंडारा- ०.८७ टक्के, चंद्रपूर- ८.१९ टक्के, गडचिरोली- २५. ८७ टक्के, पुणे (शहर)- ९.५९ टक्के या भागांचा समावेश आहे. अपघात कमी झालेल्या भागात रायगड- १२.४१ टक्के, रत्नागिरी- १३.१२ टक्के, सिंधुदुर्ग- २८.२५ टक्के, ठाणे (ग्रामीण)- १२.१८ टक्के, पालघर १७.५८ टक्के, कोल्हापूर- ३५.९९ टक्के, सांगली- १४.७२ टक्के, सातारा- १९.१५ टक्के, सोलापूर (ग्रामीण)- ८.३६ टक्के, अहमदनगर ११.९३ टक्के, धुळे- ९.०७ टक्के, नंदूरबार- १५.४१ टक्के, नाशिक (ग्रामीण) २२.३२ टक्के या भागांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती