माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रेरणेतून, अक्का फाऊंडेशनचे अरविंद पाटील यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश निपाणीकर या कलाकाराने ती साकारली आहे. दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फुटातील या प्रतिमेसाठी दीड हजार किलो अळिवाचे बीज वापरण्यात आले आहे. निलंगा शहरातील दापका रोडवर एन. डी. नाईक यांच्या शेतात ही प्रतिमा अंकुरली आहे.
शिवरायांची ही प्रतिमा साकारण्यापूर्वी जमीन समतल करण्यात आली. तिची चांगली मशागत करण्यात आली. त्यानंतर निपाणीकर व त्यांच्या चमूने पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने शिवप्रतिमा काढली व त्यावर हाताने आळीव पेरण्यात आले. अळीव लवकर अंकुरनारी, गतीने वाढणारी, आपल्या रूपाने गर्द हिरव्या रंगाचा शिडकावा करणारी, मनमोहक वनस्पती असल्याने तिचा शिवप्रतिमेसाठी वापर करण्यात आल्याचे मंगेश निपाणीकर म्हणाले. पेरलेल्या बिजास तुषार संचाने पाणी देण्यात आले व अवघ्या पाच दिवसात त्यातून शिवछत्रपती प्रतिमा रूपात आकाराला आले.