गाढ झोपेत असताना जळगावात दोन मजली इमारत कोसळली; ७ लोक थोडक्यात बचावले

गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (15:42 IST)
जळगाव शहरात शनिपेठ परिसरात महापालिकेच्या शाळेजवळ असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. 
 
पहाटे चार वाजता इमारत कोसळल्याने घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढले आहे. माती पडायला सुरुवात झाल्याने रोहित पाटील याला जाग आली आणि प्रसंगावधान राखत त्याने लागलीच कुटुंबीय रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली यांना बाहेर काढले. 
 
सर्व बाहेर निघाताच लगेच इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या खालील खोलीत कलाबाई पाटील या वृद्धा राहत होत्या. वरील मजल्यावरील सर्वांना बाहेर काढल्यानंतर आजीला बाहेर काढण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती