प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून देखील त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते परंतु डॉक्टर प्रियांका पवार या गरोदर अवस्थेत आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रात्री साडेआठ वाजता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले रुग्णाचा जीव वाचवणे हाच महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर होता.
“नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केलेल्या रुग्ण दाखल झाला. रुग्णाची तब्येत गंभीर होती त्याचे प्राण वाचवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते मी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी निफाड येथे नेणे गरजेचे होते माझी परिस्थिती बाजूला ठेवून मी स्वतः रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सारथी ची भूमिका केली. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे रुग्णाचे प्राण वाचले हे माझ्या दृष्टीने जीवनातील खूप खूप महत्त्वाचे आहे.” – डॉ. प्रियंका पवार. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे.