ही घटना शनिवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडा भागात घडली आहे. शेतमजुरीकरून अल्पवयीन मुली काम आटोपून घरी जात असताना चौघी मुलींपैकी एकाला आरोपीने शेतात ओढून नेले. तिच्या बहिणींनी धाव घेत गावाकडे जाऊन हा प्रकार सांगितला. नंतर ग्रामस्थ मुलीला शोधण्यासाठी गेले त्यांना मुलगी कापसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळली. मुलीला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.