महाराष्ट्रातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सोमवार, 29 जानेवारी 2024 (11:13 IST)
कराडच्या पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरात रविवारी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:06 मिनिटावर रिश्टर स्केलवर 3.1 ची तीव्रताचा भूकंपाचा झटका आला. याचे केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16 किलोमीटरच्या अंतरावर कोयना खोऱ्यात हेळवाक गावाच्या नैऋत्यास सहा किलोमीटर अंतरावर होता. 
 
या भुकंम्पाची तीव्रता कमी असल्यामुळे जन -धन हानी झाली नाही. तसेच धारण देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. अशी माहिती कोयना धरणाच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती