ताडोबात वाघांचा कळपच

सोमवार, 13 जून 2022 (12:21 IST)
वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता हे अतिशय भीतीदायक आणि घातक जंगली प्राणी आहेत. हे प्राणी समोर येताच भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, अनेकांना या प्राण्यांना समोरून पाहण्याची फार इच्छा असते. दोन तीनदा अभयारण्यात सफारी केली तरी जंगलाच्या राजाचे दर्शन होत नाही. बऱ्याचदा इथे असं काही दृश्य दिसतं, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. असे असताना एक, दोन, तीन नव्हे तर चक्क सहा वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले.  सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्याने ट्विटरवर असंच एक दुर्मिळ फुटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये चक्क वाघांचा एक कळप जंगलातून फिरताना दिसत आहे. ताडोबात वाघांचा कळपच पर्यटकांच्या जिप्सीसमोरून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती