पीडितेने पोलिसांनी सांगितले की, तिच्या जन्मदात्या वडिलांनीच तिच्यासोबत दुष्कृत्य केले. तसेच कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पण पीडितेने धैर्य दाखवत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी या वडील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की आरोपीला कडक शिक्षा होईल असे प्रयत्न करण्यात येतील.